Menu

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती ,डोंबिवली

Swartirth Sudheer Phadke Smruti Samiti

header photo


“ज्योती कलश छलके”

कितीजणांना माहीत आहे की सुधीर फडकेंनी २२ हिंदी चित्रपटांना आणि जवळ जवळ १७० हिंदी गीतांना संगीत दिले आहे.

त्यापैकी १९-२० गाणी विनायकने निवडली आणि गायिका आदिती प्रभुदेसाई हिला घेऊन ही हिंदी गाणी रसिकांसमोर ठेवली. कार्यक्रमाचं नाव ठेवलं “ज्योती कलश छलके”.
ही गाणी बसवणं ही तारेवरची कसरतच होती कारण यातली अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच गाणी Youtube वर आहेत.
त्यामुळे विनायक, आदिती आणि सर्व वादकांचं मनापासून कौतुक.
“ज्योती कलश छलके” ,“लौ लगती गीत गाती”(राग कल्याण),“कहा उड चले हो मनप्राण मेरे” ,“मैया मोरी मै नही माखन खायो” , “माई मैंने गोविन्द लीनो मोल” हे गैरफिल्मी गीत.
“खुश है जमाना आज पहली तारीख है”. ही प्रसिद्ध  आणि इतर गाणीसुद्धा दोघ खूप छान गातात.

ही गाणी प्रत्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहून, आपल्या कानांनी ऐकण्यातच मजा आहे.

तबल्यावर ऋषीराज साळवी, ढोलकीवर,ढोलकवर आणि octopadवर दिगंबर मानकर, संवादिनीवर उदय चितळे, बासरीवर प्रफुल्ल गोसावी, गिटारवर आशुतोष दांडगे, सिंथेसायझरवर गिरीश प्रभू  तसेच कुलकर्णी बंधू यांचे उत्कृष्ट ध्वनी संयोजन आणि  संध्या टेंबे यांचे अभ्यासपूर्ण,ओघवते निवेदन यामुळे हा कार्यक्रम अधिकच रंगतदार होतो.
दोन अडीच तास कसे जातात हे कळतच नाही.
एक छान आनंददायक कार्यक्रम बघितल्याचं समाधान मिळाल.

शनिवार ,दि २७ जुलै सायं ५ वाजता
निमकरांचे सुयोग कार्यालय,डोंबिवली

आयोजक : स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृति समिती,डोंबिवली
(सहकार्य :नागरी अभिवादन न्यास आणि प्रतिमा फिल्म सोसायटी )

 

 

याआधीचे  कार्यक्रम 
 
 
 
  • रविवार २९ जुलै २०१८ सकाळी १० वाजता ,सावित्रीबाई फुले नाट्य मंदिर 
हे वर्ष सुधीर फडके ,ग दि माडगुळकर , पु ल देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे . 
त्यांची २५ गाणी ,माडगुळकर कविता आणि पु ल यांच्या कथा यांचा तीन तासांचा भरगच्च कार्यक्रम 
प्रवेश विनामूल्य 
 
 
 
 
 तबला नवाझ अल्लारखां जन्म शताब्दी निमित्त 
पं .योगेश समसी यांचा कार्यक्रम 
दि १८ नोव्हे २०१८ संध्याकाळी  

 ***********************************

*************************************

 

स्वरतीर्थ सुधीर फडके

स्मृती समिती 

 

 

 सार्वजनिक  विश्वस्त  व्यवस्था  नोंदणी  क्र . /  / ठाणे 

अध्यक्ष         सुधीर जोगळेकर 

उपाध्यक्ष       माधव जोशी 

कार्यवाह        प्रवीण दुधे 

कोषाध्यक्ष     विनोद करंदीकर 

 

सह-कार्यवाह

 अजित नाडकर्णी

विवेक ताम्हणकर 

 

 मधुकर चक्रदेव

ऐश्वर्या नाडकर्णी

सुस्मिता  ताम्हणकर 

 श्रीपाद पटवारी

अलका मुतालिक

अजित करकरे

संदीप वैद्य

 

 

 

 
 

******************

******************

ऋतुस्वर २०१४

 

  

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 

 

 

Placeholder Image

 

 

 

रविवार दि . २७ जुलै २०१४ सायं. ५ वाजता 
ब्राह्मण सभा ,डोंबिवली
प्रवेश : विनामूल्य 
 ***********************************
२०१४ ची शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम शुभहस्ते पं. वसंतराव आजगावकर 
विजेती  रेशमा  कुलकर्णी 
आणि
 
शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या कलावंतांचा बहारदार कार्यक्रम
 
सहभाग :नुपूर काशीद,स्वप्नील भिसे ,अमृता लोखंडे ,अवधूत फडके आणि रेशमा  कुलकर्णी 
निवेदन : सौ धनश्री लेले 
*********************************
*********************************
 
 

ऋतुस्वर २०१४

  

'स्वरतीर्थ' षण्मासिक

*************************************

*************************************

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृति समिति डोम्बिवली 'स्वरतीर्थ' हे

दृकश्राव्य कलांच प्रतिनिधित्व करणारे एक परिपूर्ण षण्मासिक

पुढील महिन्यापासून सुरु करीत आहे.

जेष्ठ संगीत दिग्दर्शक,गायक,कणखर राष्ट्रभक्त स्व.सुधीर फडके

यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या

संगीत रसिकांच्या संस्थेचे एक

नवे कोरे दालन......

संपादक श्रीराम शिधये (निवृत्त सहसंपादक महाराष्ट्र टाइम्स)

आणि संपादकीय सल्लागार आहेत सुप्रसिद्ध गायिका डॉ.मृदुला

दाढे जोशी(प्राध्यापक संगीत विभाग मुंबई विद्यापीठ) आणि

पंडित रसिक हजारे ( प्राध्यापक संगीत विभाग SNDT

विद्यापीठ).

 

संपादक मंडळ :

विनायक जोशी(जेष्ठ गायक),ऐश्वर्या नाडकर्णी

(तबला वादिका -संगीत अलंकार),सुस्मिता  व विवेक ताम्हणकर

(संचालक भारतीय लोककला अकादमी),संदीप वैद्य (माजी

अध्यक्ष टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ)-हे सर्व 

समितीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत.

 

 

**************************************************

*****************************************************************

 

***********************************************************************

 

 

 

 
 
 
श्रद्धांजली
 
 
कै . सुरेंद्र बाजपेई
 
दुःखद  निधन  मंगळवार ६ ऑगस्ट २०१३

उत्कृष्ट संघटक, कार्यकर्ता,  विद्यार्थीप्रिय शिक्षक
 
आमचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष
 

 

 

 

 
  

 श्री सुधीर जोगळेकर डॉ अरुणा ढेरे  यांचे स्वागत करताना सोबत आमदार रवींद्र    

चव्हाण, चित्रा फडके आणि सौ. सुधाताई म्हैसकर 

                                                                                               आमदार रवींद्र  चव्हाण संकेत स्थळाचे (website  अनावरण

                                                                         करताना सोबत माधव जोशी आणि डॉ अरुणा ढेरे

 

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

रसिक जनहो

आमच्या संकेत स्थळावर  आपले सहर्ष स्वागत !

मराठी संगीत आणि बाबूजी यांचे नाते जसे अतूट तसेच रसिक डोंबिवली शहर आणि फडके कुटुंबीय यांचे नातेही अतूट !!

१९९५ साली बाबूजींच्या अमृत महोत्सवासाठी एक समिती डोंबिवली शहरात स्थापन झाली होती. त्यानिमित्ताने बाबूजींच्या ‘सावरकर’ या चित्रपटासाठी धन संकलनाची सुरुवात  डोंबिवलीत झाली . डोंबिवलीकरानी भरघोस मदत केली हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. ध .ना चौधरी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात साजऱ्या झालेल्या अमृत महोत्सवाला अचानक आशाताई भोसले आल्या व कार्यक्रम फार उंचीवर पोचला. कार्यक्रमानंतरही देणग्या येत राहिल्या व उर्वरीत  पुंजीतून २००२ साली बाबूजींच्या दुःखद  निधनानंतर ‘ स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती, डोंबिवली’ची स्थापना झाली. २००३ साली 'सुलश्री- एक सांगीतिक प्रवास  ' हा फडके कुटुंबाच्या सांगीतिक वाटचालीचा आढावा घेणारा सहा तासांचा भव्य दिव्य कार्यक्रम सादर  करण्यात आला . पेंढरकर महाविद्यालयाच्या सहकार्याने विद्यापीठीय स्तरावरील आंतर -महाविद्यालयीन संगीत स्पर्धा घेण्यात आली . सध्या डोंबिवली जिमखाना व गुरुकुल द डे स्कूल यांचे बरोबर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संगीत -नृत्य -नाट्य -अभिनय -वक्तृत्व स्पर्धा प्रतिवर्षी ऑगस्ट महिन्यात घेण्यात येतात व बक्षीस समारंभ १५ ऑगस्टला होतो . या द्वारे ६० शाळांमधील २००० विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे प्रकटीकरण होते 

२०११ पासून स्वरतीर्थ शिष्यवृत्ती देण्यात येते .शास्त्रीय गायन,तालवाद्य ,स्वर वाद्य,उपशास्त्रीय गायन,लोक संगीत या पाच क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या  विद्यार्थ्यास दरमहा रु .एक हजार असे पाच वर्षे समिती तर्फे 'स्वरतीर्थ ' शिष्यवृत्ती  द्वारे देण्यात येतात.

२०११ साली वेगात पुढे येणारी गायिका कु. नुपूर काशीद ,२०१२ साली उत्कृष्ट तरुण तबला वादक श्री.स्वप्नील भिसे यास ही  'स्वरतीर्थ ' शिष्यवृत्ती देण्यात आली तर  २०१३ साली दोन विद्यार्थ्यांना कु. अमृता लोखंडे आणि श्री. अवधूत फडके यांना ही   'स्वरतीर्थ ' शिष्यवृत्ती देण्यात आली .

 २०११ हे वर्ष बाबूजींनी संगीत दिलेल्या ‘भाभीकी चुडिया ‘ या चित्रपटाला ५० वर्षे पुरी झाल्याचे वर्ष . ह्या चित्रपटाने लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले . या चित्रपटातील 'ज्योती कलश छलके ' या गाण्याने अमाप लोकप्रियता मिळविली व इतिहास घडवला . २०११ सालचा स्मृतिदिन 'ज्योती कलश छलके ' या नावाने विशेष कार्यक्रम आयोजन करून समितीने २४ जुलै २०११ रोजी साजरा केला. श्री . राजदत्त व श्री. प्रभाकर जोग हजर होते . जवळ जवळ १२०० श्रोते या कार्यक्रमाला हजर होते .

आपले राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यात ५ कडवी आहेत पण आपण फक्त एकच कडवे म्हणतो .December २०११  मध्ये या गीताला १०० वर्षे पूर्ण झाली. समिती, महानगरपालिका आणि शहरातील अनेक संस्था एकत्र आल्या . एका अवर्णनीय कार्यक्रमात हे ५ कडव्यांचे संपूर्ण ‘जन गण मन’ - ६० शाळांमधील ३८०० विद्यार्थ्यांनी एक सूर एक तालात KDMC मैदानात गावून एक विक्रम प्रस्थापित केला. Magsaysay अवार्ड विजेत्या नीलिमा मिश्र या कार्यक्रमाला उपस्थित होत्या 

२०१२ साल अश्याच एका सुवर्णयोगाच ! बाबूजींचा गीतरामायाणाचा वसा समर्थपणे पुढे चालविणारे पं . वसंतराव आजगावकर यांची पहिली ध्वनीमुद्रिका १९६२ सालची .  त्यातलं एक गीत 'करात  माझ्या वाजे कंकण ' होत ज्येष्ठ गीतकार  मधुकर जोशी यांच . ते गायले होते माणिक वर्मा यांनी . माणिकताई आता नाहीत पण या सुवर्णयोगातील इतर दोन कलावंत श्री आजगावकर व श्री मधुकर जोशी जे दोघेही डोंबिवलीत स्थायिक आहेत. त्यांच्या उपस्थितीत २०१२ चा बाबूजींचा स्मृतिदिन 'करात  माझ्या वाजे कंकण ' या शीर्षकाच्या कार्यक्रमाने  साजरा झाला . दोघांचा रुपये पंचवीस हजारांची थैली देवून सत्कार करण्यात आला. पं. आजगावकर आणि त्यांचे सुपुत्र निनाद यांनी पूर्वार्धात सादरीकरण केले तर उत्तरार्धात श्री. विनायक जोशी आणि इतर कलावंतांनी श्री मधुकर जोशी यांची गीते सादर केली .

डोम्बिवलीकराना  अभिमान वाटावा असा आणखी एक कार्यक्रम ‘गौरव तालवाद्यांचा ‘-समितीने ऑक्टोबर २०१२ मध्ये सादर केला . लोककलांच्या सादरीकरणामध्ये वाजविली जाणारी अनेक वाद्ये आज अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत . रसिकांना ही वाद्ये माहीत व्हावीत या उद्देशाने लावणी सम्रादनी सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र विजय चव्हाण यांनी हा कार्यक्रम सादर केला.

स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने श्री. विवेक घळसासी यांची तीन दिवसांची व्याख्यानमाला

२०१३ च्या जानेवारीत समितीने आयोजित केली.

२०१३ च्या स्मृतिदिनाच्या  कार्यक्रमाला जोडून समितीच्या   संकेत स्थळाचे  /websiteचे उद्घाटन आ . रवींद्र चव्हाण यांचे शुभ हस्ते झाले . तसेच 'गीत रामायण -एक रसग्रहण' या श्री.किरण फाटक लिखित पुस्तकाचे प्रकाशन  डॉ . अरुणा ढेरे यांचे शुभ हस्ते झाले.

डॉ . अरुणा ढेरे  व सौ सुधाताई म्हैसकर यांचे शुभ हस्ते २०१३ ची स्वरतीर्थ शिष्यवृती या वर्षी दोघांना -अमृता लोखंडे आणि अवधूत फडके- प्रदान करण्यात आली . 

 'अनादी मी अवध्य मी '  हा बाबूजींचे आराध्य दैवत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनावरील व साहित्यावरील कार्यक्रम सावरकर दर्शन प्रतिष्ठानने सादर  केला .

रसिकजनहो  कोणताही उपक्रम करावयाचा म्हणजे आर्थिक पाठबळाबरोबर कार्यकर्त्यांची मजबूत फळी आवश्यक असते . आपण या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीत भाग घेवून हा  कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यास समितीची मदत करावी ही कळकळीची विनंती . 

आमच्याशी संपर्क साधता यावा यासाठी आमचा पत्ता 'संपर्क' या पृष्ठावर दिला आहे …. इतरत्र आमच्या कार्यकर्त्यांचे भ्रमणध्वनी दिले आहेत . 

आपल्या सक्रीय प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. 

 

 

स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती  

 

 

 

*Samiti names valid till July 31,2013

 

Website created by Madhav Jagannath Joshi